रोटरीयन शरद पै :रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदग्रहण सोहळा उत्साहात
⚡कणकवली ता.१७-:
कणकवली रोटरी क्लब हा व्हायब्रंट क्लब आहे व त्याला डायनॅमिक पर्सनॅलिटीचे प्रेसिडेंटचा वारसा लाभला आहे. नूतन कार्यकारिणीने याचा फायदा घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावा व आपल्या क्लबचे नाव आणखी उंचीवर न्यावे.असे आवाहन डीजी इन्स्टॉलिंग ऑफिसर रोटरीयन शरद पै यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल (81153) चा 16 व्या प्रेसिडेंट रो. शंकर (रवी) परब यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नूतन अध्यक्ष शंकर परब, नूतन सेक्रेटरी प्रा. जगदीश राणे, मावळते अध्यक्ष वर्षा बांदेकर, सेक्रेटरी सौ. उमा परब व्यासपीठावर उपस्थित होते.
इन्स्टॉलिंग ऑफिसर रोटरीयन शरद पै यांच्या अध्यक्षतेखाली, ए जी रो. राजेंद्र बोभाटे, एरिया हेड प्रणय तेली, एजी रो. दीपक बेलवलकर यांच्या उपस्थितीत यांच्या उपस्थितीत झाला.
मावळत्या अध्यक्षांनी आपण केलेल्या कामाचा आढावा घेऊन नवीन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्ष शंकर परब यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जल व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या स्तरावर काम करण्यासंबंधी सांगितले. झाराप येथील भगीरथ प्रतिष्ठानच्या डॉ. प्रसाद देवधर यांना रोटरीतर्फे सन्मानित करण्यात आला. ते म्हणाले आपल्या सामाजिक सुधारणांची वाट प्रत्येक नागरिकाच्या घरातून व त्याच्या त्यागातूनच होईल. कार्बनमुक्त वातावरणासाठी, धूर विरहीत स्वयंपाक घरासाठी सर्वांनी एकत्र येवून बायो गॅस उपाय योजना क रावी असे त्यांनी आवाहन केले. रोटरीयन प्रणय तेली यांनी डिस्ट्रिक्ट मधील सर्व क्लबमधील रोटेरीयन्सची एकमेकांशी ओळख करून दिली व एकत्रित प्रोजेक्ट व्हावे असा त्यांचा मानस आहे. नूतन कार्यकारिणीस त्यांनी त्यांच्या काव्य शैलीत शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात डीजी इन्स्टॉलिंग ऑफिसर रोटरीयन शरद पै म्हणाले ग्लोबल ग्रँटसाठी मी कधीही प्रयत्नशील आहे तुम्ही सर्व वलबने मिळून मोठा प्रोजेक्ट करावे व प्रसाद देवधर यांच्या कार्बनमुक्त अभियानामधील बायोगॅस प्रकल्पासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे मी तुमच्या सोबतच आहे. तसेच कार्यक्रमात जिल्ह्यातील दहावी बारावी परीक्षेमध्ये डिस्टिंक्शन मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. रोटरीतील भरीव कामगिरी केलेल्या सभासदांचा व त्यांच्या पाल्यांचा देखील सत्कार सोहळा करण्यात आला. कै. रोटरीयन रवींद्र मुसळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे शिक्षक बंधू शरद सोनू साळगांवकर यांना सन्मानित करण्यात आले. श्रीमती वैजयंती मुसळे यांनी त्यांचे पती रवींद्र मुसळे यांचे रोटरीतील राहिलेले अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी रोटरी सदस्यपद घेतल्याचे सांगितले. नूतन सेक्रेटरी प्रा. जगदीश राणे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली रोटरीयन स्नेहलता राणे व राजेश कदम यांच्या संयुक्त सूत्रसंचालनाने कार्यक्रम यशस्वी झाला.
