मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आंदोलन करणं हे मनातही नव्हतं…

बबन साळगावकर ; त्यांच्याशी माझे वैचारिक मतभेद

⚡सावंतवाडी ता.१७-: बस स्थानकाच्या प्रश्नावरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिनी आंदोलन करावं हे आपल्या मनातही नव्हतं केवळ प्रशासनाला जाग यावी यासाठी तो अल्टिमेटम होता. केसरकर यांचे वाढदिवस आम्ही दिमागदार साजरे केले.आजही त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो असे स्पष्टीकरण माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केले.

तर केसरकर यांच्याशी माझे कोणतेही वैयक्तिक मतभेद नाही आहेत ते केवळ वैचारिक मतभेद आहेत विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांच्या चुकीवर बोट ठेवणे गरजेचे आहे. आज त्यांच्याकडे मंत्रीपद असल्याने ते नेहमी बिझी असतात मात्र त्यांना ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी त्यांनी पत्रकारांसमवेत बस स्थानकाची पाहणी करावी असे मागणी ही श्री साळगावकर यांनी आज येथे केली.श्री. साळगावकर यांनी आज पत्रकार परिषद घेत आंदोलना संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

You cannot copy content of this page