जयेंद्र परुळेकर ; हवाई पाहणी करणाऱ्या केसरकरांना आंबोलीचा बंद प्रकल्प दिसत नाही का?
⚡सावंतवाडी ता.२८-: आरोंदा खाडीपात्राची पाहणी करत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन उभे करणार असे सांगतात. मात्र त्यांची
पाहणी विकासाबाबत होती की जमिन खरेदी विक्रीसाठी? असा टोला ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थित केला.
तर जनतेशी संपर्क हिन झालेले मंत्री केसरकर पर्यटनासाठी हवाई पाहणी करत आहेत, मात्र आंबोलीत 17 वर्ष बंद पडलेला प्रकल्प त्यांना दिसत नाही का..? नेमक पर्यटन विकास महामंडळ करत काय असेही ते म्हणाले.
