मन की बात कार्यक्रमाचे 100 व्या भागाचे रविवारी प्रसारण

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचे अर्थात ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे प्रसारण येत्या रविवारी दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीची सर्व केंद्रे तसेच दूरदर्शन आणि न्यूज ऑन एआरआर या अॅपवर आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावरुनही (FM 103.6 MHz) हे प्रसारण केले जाणार आहे. अशी माहिती केंद्राच्या कार्यक्रम विभाग प्रमुख सौ. सुजाता कहाळेकर यांनी दिली.

You cannot copy content of this page