तारकर्ली स्वामी समर्थ मठात १६ रोजी कार्यक्रम

⚡मालवण ता.१२-: तारकर्ली येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरुवार दि. १६ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त सकाळी ८ वा. श्री मूर्तीवर अभिषेक, दुपारी १२ वा. महाआरती, दु. १२.३० महाप्रसाद, सायं. ७.३० महाआरती, रात्रौ ८ वा. ह. भ. प. श्री. गोविंद आसोलकर बाव कुडाळ यांचे कीर्तन, रात्रौ ठिक १० वा. दत्तमाऊली पारंपारीक दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘अघोरी शंकर’ अर्थात ‘सहस्त्र नागबळी’ सादर होणार आहे.

तरी स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी मठाच्या वतीने संयोजक राजेंद्र तारी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page