मालवणातील बेपत्ता युवक कुडाळमध्ये सापडला

⚡मालवण ता.१०-: मालवण बांगीवाडा येथून बेपत्ता झालेला पारस टेकबहाद्दर बिस्ट (वय-२१) हा कॉलेज युवक कुडाळ येथे सापडला. पारसला मालवण पोलीसांनी मालवणात आणून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

बांगीवाडा येथील पारस टेकबहाद्दर बिस्ट (वय – २१ ) हा कॉलेज युवक २१ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला होता. याबाबतची खबर त्याचे वडील टेकबहाद्दर लोकबहाद्दर बिस्ट यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली होती. पारस बिस्ट हा कुडाळ कॉलेज येथे बीएससी आयटी विभागात शिकत आहे. २१ रोजी सकाळी ७.३० वाजता कुडाळला कॉलेजात जातो, असे सांगून तो घरातून निघाला होता. पारस हा कुडाळ येथे असल्याची माहिती येथील पोलीसांना मिळाली. त्यानंतर त्याला येथील पोलीस ठाण्यात आणून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

You cannot copy content of this page