⚡सावंतवाडी ता.१०-: शहरात आज धुळवाडीच्या पार्श्वभूमीवर युवकांसह लहान मुलांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली. दुपारनंतर ठीकठिकाणी ढोलताशांच्या गजरात विविध रंगांची उधळण पहायला मिळत होती.
दरम्यान आज धुळवाड दिवशी दुपारनंतर ठीक ठिकाणी लहान मुले व युवक यांनी रस्त्यावर एकत्र येत एकमेकांना रंग लावत रंगपंचमीचा आनंद लुटला. तर सायंकाळपर्यंत हा रंगपंचमी कार्यक्रम सुरू होता.
