केंद्र शाळेतील मुलांनी पाहिला शेर शिवराय चित्रपट

श्री स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेने केली सुविधा उपलब्ध

बांदा/प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा “शेर शिवराय” हा चित्रपट आज श्री स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतील मुलांना मोफत दाखविण्यात आला. यावेळी मुलांना चित्रपटाच्या मध्यंतरात इतिहासावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची मुलांनी देखील समर्पक उत्तरे दिली.
श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी बांद्यात मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. शिवविचारांवर काम करणाऱ्या प्रतिष्ठानने बांदा शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात आज केंद्रशाळेत करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, संस्थेचे उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर सावंत, खजिनदार भूषण सावंत, अक्षय मयेकर, नारायण बांदेकर, तनिष मेस्त्री, शुभम बांदेकर, शिक्षक जे. डी. पाटील, गोपाळ साबळे, सरोज नाईक, शीतल गवस आदी उपस्थित होते.
यावेळी प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने बक्षिसांचे वाटप करण्यात आले. आभार मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी मानले.

You cannot copy content of this page