बँजो, डिजे तसेच रेन शॉवरमध्ये रंग उधळण्याचा आनंद
⚡कणकवली ता.१०-: ढालकाठी मित्रमंडळातर्फे मंगळवार 21 मार्चला ढालकाठी देवस्थान परिसरात दुपारी १ ते सायंकाळी ५ यावेळेत रंग
उधळण्यासाठी रंगोत्सवाचे आयोजन केले आहे.
या उत्सवात डिजे, बँजो,रंग उधळण्यासाठी विविध रंग तसेच रेन शॉवरची व्यवस्था केली जाणार आहे.
या रंगोत्सवात शहरातील तरुण तरुणींनी तसेच नागरिकांनी सहभागी होऊन या उत्सावाचा आनंद लुटावा, असे आवाहन ढालकाठी मंडळातर्फे करण्यात आले आहे. ढालकाठी मित्रमंडळ गेली 2 वर्षे रंगोत्सव आयोजित करीत असून याचा शहरवासीय आनंद लुटत आहेत.
