⚡वेंगुर्ला ता.१०-: नेहरु युवा केंद्र सिधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान यांच्यातर्फे जनता विद्यालय तळवडे येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय समुह नृत्य स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला.
स्कूलच्या ग्रुपमध्ये श्रुती शेवडे, योजना कुर्ले, हर्षाली आरोलकर, गंधाली केळुसकर, खुशी नार्वेकर, गायत्री वरगांवकर, वैष्णवी कोचरेकर, साची गिरप, जीया साळगांवकर, महिमा नार्वेकर आदींचा सहभाग होता. समुहनृत्यासाठी विद्यार्थ्यांना शरयू गोसावी, गायत्री चेंदवणकर, प्रा.मोहिते, प्रा.वाळवेकर, पालक शेवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
