रानबांबुळी येथे तृतीयपंथी शिक्षिका रिया आ यांचे आवाहन
⚡ओरोस ता.०९-: जिजाऊ मुळे शिवबा, सीतेमुळे राम, राधे मुळे शाम, अशा अनेक संस्कारातून महिला जात असतात आज जागतिक महिला दिन हा आपल्या हक्काचा दिवस आहे या उपक्रमातून प्रत्येक महिलेची ताकद अनेक गुण आत्मसात करून संधीचं सोनं करा, मी एक तृतीयपंथी म्हणून वावरताना देशात पहिली तृतीयपंथी महिला शिक्षिका म्हणुन कार्यरत आहे, त्या काळात बाळगलेली जिद्द आणि ताकद यातूनच आज देशात पहिली तृतीयपंथी महिला शिक्षका म्हणून कार्यरत आहे असे उद्गार रिया आळवेकर यांनी काढले.
कुडाळ तालुक्यातील रानबाबुळी येथे उन्नती महिला मंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मेळाव्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन तृतीयपंथी पहिली शिक्षिका रिया आळवेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी मंडळाच्या अध्यक्ष दिक्षाठाकूर, उपाध्यक्ष अंजली कदम, सचिव डॉ. वैदही आईर, खजिनदार जान्हवी सावंत, अस्मिता साईल, साक्षी गोसावी , आदींसह मंडळाचे पदाधीकारी सदश्य, सरपंच परशुराम परब ,उपसरपंच सुहास बाबुळकर, माजी सरपंच वसंत बांबुळकर, सतीश परब, बबन काका परब, अशोक परब, आदींसह गावातील व पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .यावेळी शासनाचाअहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त शिक्षिका प्राप्ती चिंदरकर, तृतीयपंथी शिक्षिका रिया आळवेकर आणि राष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धेत सिल्वर मेडल प्राप्त कुमारी पूर्वा गावडे आदींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यकम पार पडले यामध्ये गावातील बचत गट, महिला गट यांनी भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले
यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटक तृतीयपंथी शिक्षिका रिया आळवेकर म्हणाल्या एखादी स्त्री आई होऊ शकली नसती तर जिजाऊचा शिवबा, राधेचा श्याम, सीतेचा राम होऊ शकला नसता आज महिलांना अनेक संस्कारातून जावे लागत आहे आजचा आपला जागतिक महिला दिन हक्काचा दिवस आहे त्यानिमित्त आपण आयोजित केलेल्या या महिला मेळावा आणि त्यात माझा सत्कार केला त्याबद्दल मंडळाचे आभार मानून आपण केलेला हा सत्कार मी कधीही विसरू शकत नाही आपले आयोजित करण्यात आलेले उपक्रम स्तुत्य आहेत मी एक तृतीयपंथी शिक्षिका म्हणून समाजात येत असताना अनेक अडीअडचणीतून जावे लागले पण आपण शाळेत असलेल्या हुशारी पहिल्यांदा पुरुष व त्यानंतर स्त्री मधील संस्कारातून तृतीयपंथी म्हणून मला संज्ञा मिळाली या प्रवासाला न डगमगता डी एड व शिक्षणातून जिल्ह्यात पहिली तृतीयपंथी शिक्षिका कार्यरत आहे वाटचाल करत आहे आज जिल्हा वाशी यानी मला स्वीकारू माझा सन्मान केला रान बांबुळी गावाने जो माझा सन्मान केला तो मी कधी विसरू शकत नाही,
अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त प्राप्ती चिंदरकर म्हणाल्या रानबांबुळी ही माझी जन्मभूमी आहे आज माझा अहिल्याबाई होळकर आदर्श शिक्षिका म्हणून शासनाचापुरस्कार मिळाला त्याचा आपण सन्मान केला प्रामाणिकपणे काम केल्याचे हे उदाहरण आहे, हा पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्यातील होता परंतु अचानक माझ्या नावाची चर्चा होऊन मला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे आज महिला चुल आणि मुल पर्यंत न राहता देशाच्या राष्ट्रपती व विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, प्रत्येक महिलेने कलागुण आत्मसात करून संधीचे सोने केले पाहिजे नारी तू घे भरारी पाहू नको माघारी, या उक्तीप्रमाणे कार्य केले पाहिजे आजच्या या महिला दिन सर्वांना शुभेच्छा देते अशाही त्या म्हणाल्या
या भरगच्च कार्यक्रमात ईतर मान्यवरांचे ही स्वागत सत्कार करण्यात आले. शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. [सोबत फोटो
