शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शहर शिवसेना महिला आघाडीचे आयोजन;
सावंतवाडी : जागतिक महिला दिनानिमित्त जगन्नाथ राव भोसले उद्यान येथे सावंतवाडी शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे विविध कार्यक्रम तसेच महिलांचे सत्कार करण्यात आले. शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहीणी सोळंके यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांसाठी विविध गुणदर्शनपर कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो, माजी नगरसेविका भारती मोरे, शुभांगी सुकी, दिपाली सावंत, अँड. निता कविटकर, किर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, स्वप्ना नाटेकर महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
