परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी स्वाती देसाई यांचा महिला दिनी सत्कार

इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अंम्बेसिडर ऑर्गनायझेशनचा पुढाकार

देवगड
इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स ॲम्बेसिडर ऑर्गनायझेशन या संघटनेच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवगड तालुका शाखेच्या वतीने देवगड तहसीलदार तथा परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी स्वाती देसाई यांचा सन्मानचिन्ह गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला व पुढील प्रशासकीय सेवेस शुभेच्छा व्यक्त केल्या .

या महिला दिनाच्या निमित्ताने देवगड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक पूर्वाश्री आचरेकर,पल्लवी मांजरेकर,लिपिक प्राजक्ता चिंदरकर,अंकिता जाधव,वैभवी हिंदळेकर तसेच देवगड पोलीस स्थानकातील महिला पोलीस हवालदार अन्वीता कदम,महिला पोलीस नाईक प्राजक्ता कविटकर ,ज्योती परब महिला पोलीस कॉन्स्टेबल,प्रियांका देवगडकर देवगड ग्रामीण रुग्णालयातील सर्व परिचारिका यांनाही महिला दिनाच्या निमित्ताने गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी ह्युमन राईट्स संघटनेचे तालुका अध्यक्ष दयानंद तेली,पोलीस संरक्षण जिल्हा अध्यक्ष ,विजय कदम,मीडिया तालुका अध्यक्ष दयानंद मांगले , अपंग संघटना तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव,सिंधुदुर्ग जिल्हा महिला कार्यकारी अध्यक्षा दीपिका मेस्त्री,तालुका कार्यकारणी सदस्य प्रीती वाडेकर,उपस्थित होते .या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा दीपिका मेस्त्री,तालुका सदस्य प्रीती वाडेकर यांनाही संघटना पदाधिकारी यांनी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.

You cannot copy content of this page