भाजप शहर चिटणीस विनोद सावंत यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी
⚡सावंतवाडी ता.०८-: नगरपरिषद सावंतवाडी यांच्या मार्फत सालईवाडा परिसरात करण्यात आलेले गटाराचे काम अर्धवट करण्यात आले असून, त्याचा नाहक त्रास तेथील रहिवाश्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सबंधित अर्धवट काम पूर्ण करावे अशी मागणी भाजपचे सावंतवाडी शहर सरचिटणीस विनोद सावंत यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
यावेळी राजा स्वार, माजी नगरसेवक, प्रकाश मसुरकर, राजू भाट, संतोष खानविलकर, सुधीर भोगटे, पंढरी आकेरकर बंड्या धार्गळकर रंजन शिरसाट, सुधीर नेवगी, दत्तराज विर्नोडकर, जेसिता डिसोझा, अमर वाळके, अनंत सारंग, अशोक कुलकर्णी. संदीप कांदे.आदी उपस्थित होते.
