विविध लक्षवेधी कार्यक्रमांचे आयोजन
⚡ओरोस ७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या जागतिक महिला दिन पर ठिकठिकाणी विविध कार्यक्रम नारी शक्तीचा जागर रंगणार असून सिंधुदुर्गनगरीत विविध संस्था, शासकीय कार्यालय आणि उमेद अभियान जन शिक्षण अंतर्गत महिला दिन पर कार्यक्रम आयोजित केले आहेत.
जागतिक महिला दिन दरवर्षी साजरा केला जातो सालाबाद प्रमाणे यावर्षीही महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन समिती नवीन सभागृहात सकाळी १० ते ४ या वेळेत महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे
,यावेळी विविध कार्यक्रम मान्यवरांची भाषणे ठेवण्यात आली आहे. तसेच जन शिक्षण संस्था यांच्या माध्यमातूनही “क्षमता विकास प्रशिक्षण “कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ,मानव विकास संस्था संचलित जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात भरीव काम हाती घेण्यात आले आहे सिंधुदुर्गनगरी येथील भव्य दिव्य अशा इमारतीमध्ये प्रथमच क्षमता विकास प्रशिक्षण आयोजन केले आहे.
तसेच जिल्हा ग्रामीण विकास विभाग अंतर्गत उमेद अभियानच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात महिला दिनाचे औचित्य साधून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कंपन्यांची प्रमाणपत्र वितरण तसेच उमेद अभियान अंतर्गत बचत गटांच्या आणि महिलांच्या विकासात्मक योजनांचे मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच ओरोस येथील महिला नारीशक्तीच्या माध्यमातून ग्रामपंचायत आणि सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने महिला दिन साजरा होणार आहे .जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, शासकीय वसाहती, वीविध राजकिय पक्ष, रानबांबुळी ग्रामपंचायत त्यांच्या माध्यमातून महिला मेळावे विविध उपक्रम स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हाभरात महिला दिनाची रेलचेल सुरू असून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
