मालवण येथे महिलांसाठी झालेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रन फॉर हेल्थ चा संदेश देण्याचा स्पर्धेमागील मुख्य उद्देश

मालवण (प्रतिनिधी)

महिला दिनाचे औचित्य साधून ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल रक्तविरांगना मालवण आयोजित आणि हॉटेल मालवणी व मंगलमूर्ती स्कुबा डायविंग मालवण यांच्यातर्फे पुरस्कृत मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील प्रथमच महिलांसाठी पार पडलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेमागील संकल्पना असणारा ‘रन फॉर हेल्थ’ हा संदेश घेऊन धावणाऱ्या सर्व गटातील स्पर्धकांनी २ कि.मी.चे अंतर पार केले. यामध्ये १६ ते ३० वयोगटात दिव्या संजय मंडलिक, ३१ ते ४५ वयोगटात स्नेहा खवणेकर, यांनी प्रथम क्रमांक पटकवला. तर ४५ वर्षावरील खुल्या गटाच्या चालण्याच्या स्पर्धेत सौ. अनुष्का नागेश कदम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

जागतिक महिला दिन निमित्त आज धूलीवंदन सुट्टीच्या दिवशी सकाळी मालवणात ही स्पर्धा उत्साहात पार पडली. फक्त महिलांसाठी असलेल्या या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत तिन्ही वयोगटात एकूण १४२ महिलांनी सहभाग दर्शविला. मालवण देऊळवाडा येथून सागरी महमार्ग ते कोळंब पुल या मार्गावर एकूण २ किलोमीटर अंतरासाठी ही स्पर्धा पार पडली. यामध्ये १६ ते ३० व ३१ ते ४५ या वयोगटासाठी धावणे तर ४५ वर्षावरील खुल्या गटासाठी चालण्याची स्पर्धा घेण्यात आली. देऊळवाडा येथे शिक्षिका सौ. सुविधा तिनईकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन झाले.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे- १६ ते ३० वयोगट – १.दिव्या संजय मंडलिक, २. अक्षता मिलिंद मालंडकर, ३. निळा नरेश धुरी, ४. सीमा प्रकाश खरवते (उत्तेजनार्थ), ५. महिमा विशाल मोहिते, ६. अनुष्का चंद्रशेखर आंबेरकर, ७. श्रेया सागर आंबेरकर, ८. सानिका सुशील तारी, ९. स्नेहल नंदकिशोर परब, १०. सान्वी सिद्धांत नलावडे. ३१ ते ४५ वयोगट – १. स्नेहा खवणेकर, २. पद्मिनी प्रकाश मयेकर, ३. सुचिता सुभाष तायशेटे, ४. नैना नितेश तळगावकर (उत्तेजनार्थ), ५. नीलम प्रसन्नकुमार मयेकर, ६.ऑलविना नेत्सन रईस, ७. राणी पराडकर, ८. गार्गी गौरव ओरसकर, ९. दिव्या दिनेश कोचरेकर, १०. साक्षी चंद्रशेखर मयेकर. खुला गट (चालणे) – १. अनुष्का नागेश कदम, २. ऋतुजा रवींद्र वारिशे, ३. विजया कांदाळगावकर, ४. साक्षी वर्दम (उत्तेजनार्थ), ५. वृषाली सापळे, ६. तेजल वेंगुर्लेकर, ७. वैष्णवी सारंग, ८. मनाली इब्रामपूरकर, ९. सुनीता जाधव, १०. मेघना जोशी.

मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेते व उत्तेजनार्थ क्रमांक स्पर्धकांना प्रमाणपत्र, चषक व मेडल देऊन गौरविण्यात आले. तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. तसेच यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मधील विजेत्या विजया कांदळगावकर, मनाली दळवी, दीपा वनकुद्रे यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक पद्मजा वझे, पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, शिक्षिका सुविधा तिनईकर, लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष वैशाली शंकरदास, सचिव अनुष्का चव्हाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मेघना जोशी, प्रा. सुमेधा नाईक, सौ. वेंगुर्लेकर, कोळंबच्या सरपंच सिया धुरी, शिक्षिका सारिका शिंदे आदी उपस्थित होत्या. स्पर्धेचे सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले.

या स्पर्धेसाठी नेहा कोळंबकर, राजा शंकरदास, राधा केरकर, बंटी केरकर, रेनोल्ड बुतेलो, संदीप पेडणेकर, अमेय देसाई, गणेश कोळंबकर, उत्तम पेडणेकर, दीपक ढोलम, रश्मीन रोगे, विकास पांचाळ, राजू बिडये, रूपा बिडये, ललित चव्हाण, कोमल चव्हाण, समृद्धी धुरी, प्रियल लोके, गंगाराम आडकर, मालवण ग्रामीण रुग्णालय कर्मचारी, पोलीस व होमगार्ड कर्मचारी यांसह इतरांचे मोलाचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page