दांडीतील जॉर्ज डिसोझा यांना मालवण नगरपालिकेकडून टीडीआर प्रमाणपत्र प्रदान

मालवण : दांडी येथील जॉर्ज पीटर डिसोजा यांनी दांडी शाळा ते दांडेश्वर मंदिर मार्गावरील रस्त्यासाठी ५ गुंठे जागा मालवण नगरपालिकेला दिली. याबाबत जॉर्ज यांना मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून टीडीआर सर्टिफिकेट देण्यात आले. हे सर्टिफिकेट जागेच्या प्रमाणात एफएसआय उपलब्ध करून देणारे आहे. स्वतः बांधकाम करताना मिळालेल्या परवानगी पेक्षा जास्त बांधकाम साठी तसेच अन्य कोण बांधकाम करत असेल तर त्यांनाही हे सर्टिफिकेट विकत देऊन तेवढा एफएसआय त्याला मिळू शकतो. महत्वाचे असे हे टीडीआर सर्टिफिकेट आहे.

अनेक वर्षे रखडलेला हा रस्ता होण्यासाठी माजी नगरसेविका सेजल परब तसेच माजी नगरसेवक पंकज सादये, माजी नगरसेविका तृप्ती मयेकर यांसह तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत यांचे सहकार्य लाभले. तर आमदार वैभव नाईक यांचे मार्गदर्शन या सर्व प्रक्रियेत महत्वाचे ठरले.

गेली २५ वर्षे रखडलेला रस्ता झालेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशहरप्रमुख संमेश परब यांनी जॉर्ज डिसोजा यांसह सर्व नागरिकांचे आभार मानले.

मालवण नगरपालिकेत जॉर्ज डिसोजा कुटुंबीय व माजी नगरसेविका सेजल परब यांना पालिका अधिकारी यांनी टीडीआर सर्टिफिकेट सुपूर्द केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख संमेश परब, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेवक पंकज सादये, तपस्वी मयेकर, नरेश हुले, प्रसाद आडवणकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page