आडारी येथील डेकोरेटिव्ह पोलचे नुकसान

⚡मालवण ता.०७-: मालवण शहरातील आडारी येथील गणपती मंदिर येथे खाडी किनारी मालवण नगरपरिषदेच्या वतीने विशेष वैशिष्ट्य पुर्ण योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या डेकोरेटिव्ह पोल (पथदीप) पैकी एका पथदीपाचे अज्ञातकडून नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी मालवण नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने मुकादम आनंद वळंजू यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page