सावंतवाडी, मालवण येथे एकदिवसीय संविधान संवादशाळा

⚡मालवण ता.०७-: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, बार्टी समतादूत आणि फुले, शाहू आंबेडकर विचारमंच यांच्यावतीने दि. १८ व १९ मार्च रोजी सावंतवाडी व मालवण येथे एकदिवसीय संविधान संवादशाळा- ‘चला संविधान समजून’ घेऊया या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १८ मार्च रोजी श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी व १९ मार्च रोजी बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे सकाळी ९.३० ते ५ वाजेपर्यंत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोप्या शब्दात संविधानाची तोंड ओळख, विविध उपक्रमाद्वारे संविधान संवाद, खेळ, गाणी, गप्पा गोष्टी, चर्चा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे सचिव राजवैभव शोभा रामचंद्र हे या कार्यक्रमाद्वारे संवाद साधणार आहेत. प्रशिक्षणार्थीना प्रवेश निःशुल्क असणार आहे. परंतु पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागी प्रशिक्षणार्थीना सेवांगणतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सहभागी प्रशिक्षणार्थीनी १६ मार्च पर्यंत सावंतवाडीकरीता संदिप निंबाळकर ९४२२६३३९४९, लक्ष्मीकांत खोबरेकर ९४२२९४६२१२ यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी. असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगण, बार्टी समतादूत व फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page