ज्ञानी मी होणार जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत घोटगे वायांगणतड शाळा विजेती

तालुक्यात होतेय कौतुक;विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत निर्विवाद यश संपादन केले..

दोडामार्ग
ज्ञानी मी होणार या जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटगे-वायंगणतड प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी मिळविलेल्या उज्वल यशाबद्दल दोडामार्ग तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटगे – वायंगणतड या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत निर्विवाद यश संपादन केले. या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचे उदाहरण जिल्ह्या समोर ठेवले आहे. एक शिक्षकी असलेल्या या प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बद्दल कौतुकाची थाप मिळत आहे. इयत्ता चौथीतील चिन्मय रामचंद्र तोरस्कर व इयत्ता तिसरीतील आराध्या अभय नाईक यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रशालेचे उच्च विद्याविभूषित शिक्षक डॉ. उत्तम तुकाराम तानवडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विजेत्या विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक, शिक्षण विस्तार अधिकारी दीपा दळवी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page