रॉयल किंग सावंतवाडी यांनी केले आहे आयोजन
⚡सावंतवाडी ता.०३-: रॉयल किंग सावंतवाडी आयोजित जिमखाना मैदान येथे भव्य ओवरआर्म क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेचे उद्घाटन भाजप महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा आज 3 ते 5 मार्च पर्यंत चालणार आहे. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ४४ हजारा रुपयांचे ठेवण्यात आले तर द्वितीय पारितोषिक २२ हजार रुपये असे ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत अनेक टीमने सहभाग घेतला आहे.
