हडी येथील शिवणवर्गाचा २५ महिलांनी घेतला लाभ

⚡मालवण ता.०२-: हडी शाळा नं. २ येथे सौ. आर्या गावकर यांच्या प्रयत्नातून शासन मान्य संस्थेतर्फे शिवणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २५ महिलांनी सहभाग घेतला.

या शिवणक्लास प्रशिक्षणाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्यांना सौ. शिल्पा खोत व हडी गावचे सरपंच प्रकाश तोंडवळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून सौ. दिव्या कोचरेकर यांनी काम पहिले. यावेळी ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत पाटकर, कोळंबच्या सरपंच सौ. सिया धुरी, सौ. आर्या गावकर, सौ. निनाक्षी शिंदे- मेतर , प्रज्ञा सुर्वे, सौरभी अमरे, शांती तोंडवळकर, दिक्षा गावकर, पूजा तोंडावळकर, रिया आचरेकर, पूजा हडकर, स्वरा पोयरेकर, उमेश हडकर, दिनेश सुर्वे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page