सीसीटीव्ही कॅमेरात काही युवक कैद; पोलीस घेत आहेत शोध…
सावंतवाडी : येथील शहरात पेट्रोल चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून यामागे मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांना असून पोलिसांनी या दृष्टीने तपास सुरू केला आहे. काही युवक पेट्रोल चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाले असून त्या युवकांचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबतची अधिक माहिती आशी की सावंतवाडी शहरात पेट्रोल चोरी तसेच गाड्यांच्या बॅटरी चोरीचे प्रकार वाढले असून याबाबत काही नागरिकांनी पोलीसांना कल्पना ही दिली आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणाही लेखी तक्रार दिली नाही.मात्र पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले आहेत अनेक संकुलांच्या पार्किंग मध्ये गाड्या लावण्यात येतात तिथून मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोलची चोरी करण्यात येत असल्याचे दिसून आले.
असेच शहरातील सालईवाडा येथील एका इमारतीच्या पार्किंग मध्ये लावण्यात आलेल्या दुचाकी मधून काहि युवक पेट्रोल ची चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाले असून हे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांना देण्यात आले या फुटेज वरून चोरी करणारी टोळी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले असून या युवकांनी अनेक इमारतीच्या पार्किंग मधील दुचाकीचे पेट्रोल चोरल्याचे पुढे आले आहे.
