जांभवडे येथील युवक बेपत्ता

⚡कुडाळ ता.०१-: पायाला दुखापत झाली असल्याने आपण डॉक्टरकडे जातो असे सांगून गेलेला जांभवडे भुतवड गावकरवाडी येथील सतरा वर्षीय ओंकार छगन देसाई हा घरी परतला नाही. कुडाळ पोलीस ठाण्यात याबाबत दिलेल्या जांभवडे भुतवड गावकरवाडी येथील प्रतिभा प्रकाश सावंत (वय ५८) यांनी फिर्यादीवरून फुस लावून पळवून नेल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात कुडाळ पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रतिभा सावंत यांचा नातू ओंकार छगन देसाई हा २४ फेब्रुवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून घरी परतलेला नाही त्याच्या पायाला दुखापत झाली होती. म्हणून त्याने आपण डॉ. काजरेकर यांच्याकडे जातो असे सांगून गेला तो घरी परतला नाही. हा मुलगा वयाच्या एक वर्षापासून आपल्या आजी जवळ राहत आहे. दरम्यान पोलीस ठाण्यात कुणीतरी फुस लावून त्याला पळवून नेला असावा. म्हणून भा. द. वि. कलम ३६३ अन्वये अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली आहे.

You cannot copy content of this page