⚡मालवण ता.०१-: आई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पोईप येथील इं. द. वर्दम हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले. यामध्ये निबंध स्पर्धेत प्रशालेची स्वरा दिनेश परब हिने ५ वी ते ७ वी या गटातून द्वितीय क्रमांक तर वेदिका विनोद परब हिने ८ वी ते १० वी या गटातून द्वितीय क्रमांक मिळविला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर, मुख्याध्यापक व्ही. एन. कुंभार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.
