⚡सावंतवाडी ता.०१-: साटम महाराज कला क्रीडा सेवा मंडळाच्यावतीने निरवडे झरबाजार येथे गुरुवार ९ ते ११ मार्च रोजी तुकाराम बीज तिथी साटम महाराज यांच्या ८६ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
यनिमित्त गुरुवार ९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मूर्तिपूजन व पादुका पूजन, दुपारी १२ वाजता आरती, १२. ३० वाजता तिर्थप्रसाद, १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती, रात्री ७ वाजता बुवा रुपेंद्र परब ( वडखोल ), बुवा सुंदर मेस्री ( कसाल ), बुवा चिन्मय सावंत ( कणकवली ) या भजना बुवांचा जुगलबंदी कार्यक्रम, शुक्रवार १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता महिला मंडळ निरवडे यांचा हरिपाठ व आरती, रात्री ८ वाजता (सिंधुदुर्ग गोवा राज्य) खुली रेकॅार्ड डान्स स्पर्धा प्रथम पारितोषिक ७०२३ व आकर्षक चषक, व्दितीय पारितोषिक ५०२३ व आकर्षक चषक, शनिवार ११ रोजी सायंकाळी ४ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम , सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती , रात्री ८ वाजता लिलाव, रात्री ९ वाजता नामवंत कलाकार यांचा संयुक्त दशावतार ‘ वीर बब्रुवान ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे . तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन साटम महाराज कला क्रीडा सेवा मंडळाने केले आहे .
