जिल्हास्तरीय दैवज्ञ चषक 2023

सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज मंडळातर्फे वेंगुर्लेत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ले-: सिंधुदुर्ग सुवर्णकार समाजातील युवक संघटितपणे एकत्र येण्यासाठी वेंगुर्ले कँम्प येथील क्रीडांगणावर दि. 4 मार्च रोजी दैवज्ञ चषक 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.


या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यास रोख रुपये 11,000 व उपविजेत्यास रोख रुपये 7,000 आणि चषक तसेच मालिकावीर सामनावीर सर्वोत्कृष्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाज सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनाही आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.


या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून दैवज्ञ समाजातील युवकांना संघटित करण्याचा हा प्रयत्न आहे. या स्पर्धेत दैवज्ञ समाजातील युवकांनी आपल्या संघासह भाग घ्यावा. तसेच स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी दैवज्ञ समाज बांधवाबरोबरच क्रिकेट रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्लेचे अध्यक्ष दिपक मालवणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page