बबन साळगावकर, अन्नपूर्णा कोरगावकर यांनी केला निषेध
⚡सावंतवाडी ता.०१:-: नगरपरिषद प्रशासनानं पाणीपट्टी व घरपट्टीत केलेल्या सरसकट वाढीविरोधात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करत या करवाढीचा तीव्र शब्दांत निषेध केला.करवाढ रद्द न झाल्यास न.प.वर धडक देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
ही दरवाड केल्यान 100 युनिटला 300 रू, 1 हजार युनीटला 3 हजार रुपये, 10 हजार युनीटला 30 हजार रुपये अशी वाढ होणार आहे. ही अन्यायकारक वाढ रोखली गेली पहिजे. त्यासाठी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज घंटानाद केला आहे. ही दरवाड रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ती प्रशासनाला रद्द करावीच लागेल. प्रांतांधिकारी यांनी भेटण्यासाठी उद्याची वेळ दिली आहे.
हा दरवाढीमुळे 1 कोटी 75 लाख रुपयांचा बोजा जनतेवर पडणार आहे. त्यामुळे ही रद्द झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे. उपस्थित माजी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, उमाकांत वारंग यांनी याचा निषेध करत दरवाढ रद्द करण्याची मागणी केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगांवकर, उमाकांत वारंग, माजी नगरसेवक अफरोज राजगुरू, विलास जाधव, सुरेश भोगटे, संतोष तळवणेकर, रवी जाधव आदींसह नागरिक उपस्थित होते.
