अंधेरी महोत्सवाची आजपासून धूम

राष्ट्रीय कामगार सेनेतर्फे मरोळनाका नवपाडा मैदान येथे १२ दिवस भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन

⚡मुंबई दि.०१-: राष्ट्रीय कामगार सेनेतर्फे भव्यदिव्य अंधेरी महोत्सव १ ते १२ मार्च २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. हा महोत्सव मरोळनाका नवपाडा मैदान, अंधेरी (पूर्व) मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून उपस्थित रहाण्याचे आवाहन राष्ट्रीय कामगार सेनेचे अध्यक्ष तथा भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष गुरुनाथ खोत व सरचिटणीस शैलेश गुरुनाथ खोत यांनी केले आहे.
दिनांक १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता स्वागत समारंभ होईल. यावेळी महोत्सवाचे उद्घाटन आमदार ऋतुजा लटके यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पहिल्याच दिवशी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दिनांक २ मार्चला सायंकाळी ७ वाजता साईलीला, शुक्रवार दिनांक ३ मार्चला सायंकाळी ७ वाजता लावणी नृत्य, शनिवारी ४ मार्चला सायंकाळी ७ वाजता मराठी चित्रपट नृत्याविष्कार, रविवारी ५ मार्चला सायंकाळी ७ वाजता हिंदी चित्रपट नृत्याविष्कार, सोमवारी ६ मार्चला सायंकाळी ७ वाजता चित्रकला स्पर्धा व मंगळागौर नृत्य होणार आहे. मंगळवारी ७ मार्चला सायंकाळी ७ वाजता जादूचे प्रयोग होणार आहेत. बुधवारी ८ मार्चला सायंकाळी ७ वाजता डबलबारी भजनांचा जंगी सामना होणार आहे. गुरुवारी ९ मार्चला सायंकाळी ७ वाजता नृत्य गायन स्पर्धा, शुक्रवारी १० मार्चला सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज देखावा, शनिवार दिनांक ११ मार्चला सायंकाळी ७ वाजता दशावतार नाट्यप्रयोग आणि रविवार १२ मार्चला सायंकाळी ७ वाजता होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांसाठी विशेष आकर्षण दररोज एक लकी ड्रॉ आकर्षण पैठणी देण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page