जुना मुंबई महामार्गावरील घटना; कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी घेतली दखल…
⚡सावंतवाडी ता.२८-: मुंबई गोवा जुन्या झाराप इन्सुली महामार्गावर मध्यरात्री भलेमोठे झाड कोसळल्याने तब्बल दोन तास खंडीत झालेली वाहतूक सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ अनामिका जाधव चव्हाण यांच्या तत्परतेमुळे सुरळीत करण्यात यश मिळाले.
ही घटना सोमवारी 27 फेब्रुवारीला मध्यरात्री साडेबारा वाजता च्या सुमारास घडली झाराप ते सावंतवाडी या महामार्गावर खान मोहल्ला या ठिकाणी महामार्गाच्या कडेला असलेले भले मोठे झाड महामार्गावर आडवे झाल्यामुळे सावंतवाडी कडे येणारी आणि सावंतवाडीहून मुंबई गोवा महामार्गाकडे जाणारी सर्व वाहतूक खंडित झाली मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा दोन्ही बाजूला लागल्या होत्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागात कडे संपर्क साधला असता कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी तत्परतेने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून महामार्गावर पडलेले झाड बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली सुमारे तास ते दीड तास या मार्गावरची वाहतूक खंडित झाली होती कार्यकारी अभियंता सौ चव्हाण यांच्या कार्यतत्परतेबद्दल वाहनचालकात समाधान व्यक्त होत आहे या कामी सहाय्यक बांधकाम अभियंता राहुल आडोले यांच्यासह कर्मचाऱ्यांना घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली
