निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्य;कै.उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाच्या वतीने आयोजन..

बांदा/प्रतिनिधी
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक वैजनाथ देवण, बी. एस. राणे, वाचनालयचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, संचालक बी. एस. मुळीक, ऐक्यावर्धक संघांचे संचालक रमाकांत राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. ज्येष्ठ मराठी साहित्यिक तथा नाटककार वसंत कानेटकर यांच्या कादंबरी, ग्रंथ यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यावेळी वाचनालयात आयोजित विविध स्पर्धामधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री देवण म्हणाले की, मराठी ही आपली मायबोली आहे. तिचे महत्व जाणून मराठी भाषा टिकविणे व समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी विशेषतः तरुण पिढीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर यांनी केले. आभार हेमंत खानोलकर यांनी मानले. यावेळी ग्रामपंचायतच्या देणगीतून मिळालेल्या युपीएससी, एमपीएससी पुस्तकांचे देखील प्रदर्शन मांडण्यात आले होते.
फोटो :-
मळगाव येथील खानोलकर वाचनालयात विजेत्या मुलांसोबत उपस्थित असलेले मान्यवर. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page