बांदा/प्रतिनिधी
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती, सावंतवाडीची विशेष सभा शनिवार दिनांक ४ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता समाजमंदिर, सावंतवाडी येथे आयोजित केलेली आहे.
तरी सदर सभेस सर्व समाज बांधवासह फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या सर्व समाजातील बांधवांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सभेपुढील विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे नियोजन करणे. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणारे विषयावर चर्चा विनिमय करण्यात येणार आहे. तरी या सभेस सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव, सचिव सुरेश जाधव यांनी केले आहे.
आंबेडकर प्रबोधन समन्वय समितीची ४ रोजी सभा
