अन्यथा जिल्हाधिकारी यांच्याशी करणार चर्चा;भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची पत्रकार परिषदेत माहिती
⚡सावंतवाडी ता.२८-: नगरपालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ केल्याने आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ स्थगिती देण्याची मागणी करणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान इतर कोणत्याही नगरपालिका मध्ये कोणताही दर वाढल नसल्याने मात्र सावंतवाडीच्या मुख्याधिकाऱ्यांना घाई का..? असा सवाल ही राजन तेली यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ते सावंतवाडीत येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
तेली म्हणाले कि या घरपट्टी व पाणीपट्टी वाढी बाबत पहिले त्यांनी लोकप्रतिनिधी जेनतेची चर्चा केली पाहिजे होती. मात्र तसे न करता मुख्याधिकारी यांनी स्वतःच्या मर्जीने निर्णय घेतल्याने त्यांनी ही वाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तत्काळ स्थागिती देण्याची मागणी करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर,माजी नगरसेवक मनोज नाईक,माजी नगरसेवक राजू बेग,माजी नगरसेवक सुधिर आडीवरेकर,माजी नगरसेवक आनंद नेवगी,माजी विनोद सावंत, दिलीप भालेकर,आदी उपस्थित होते.
