घरपट्टी व पाणीपट्टी वाढ विरोधात जनआंदोलन उभारणार…

बबन साळगावकर;उद्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन लक्ष वेधणार…

⚡सावंतवाडी ता.२८-: येथील नगरपरिषदेने घरपट्टी व पाणीपट्टी वाढवून एक प्रकारे नगरपालिका प्रशासन जनतेची लुट करत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केली. दरम्यान या विरोधात उद्या प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन पुढील भूमिका ठरू असे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच एकीकडे महागाई वाढलेली आहे तसेच पाणी आणि गर पट्टी वाढली त्यामुळे लोकांनी जगायचं कसं त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलनाची दिशा ठरवणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर माजी नगरसेवक विलास जाधव माजी नगरसेवक उमाकांत वारंग माजी नगरसेवक सुरेश भोगटे आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page