जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धेत देवगडाच्या शेठ म. ग. हायस्कुलचे ‘बुरगुंडा’ प्रथम

⚡मालवण ता.२७-: कांदळवन संवर्धनाबाबत जाणीवजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने जैव विविधतेचा आसरा कांदळवन, तटरक्षक धुपरक्षक कांदळवन पर्यावरणाचे फुफ्फुस कांदळवन या विषयांवर आधारित मँग्रुव्ह फाउंडेशन, इको फोक्स व्हेंचर्स आणि स्वराध्या फाउंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धेत देवगड येथील शेठ म. ग. हायस्कुलच्या ‘बुरगुंडा’ या बालनाट्याने प्रथम क्रमांक पटकावला. या विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेसाठी हॉटेल चैतन्य व उबंटू कॅफे हे सहप्रायोजक होते. स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. या संघांनी कांदळवन संवर्धन व पर्यावरण रक्षण या विषयावर संदेश देणारी नाट्य सादर केली. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मित्र शिरगाव संघाच्या ‘बारस’ या नाट्याने मिळवला तर रोझरी इंग्लिश स्कुल मालवणच्या ‘मुलमंत्र’ या नाटकाने तृतीय क्रमांक मिळवला तसेच युरेका सायन्स सेंटर कणकवलीच्या ‘नवी पालवी फुटेल’ या नाट्याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

या स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे:- उत्कृष्ट लेखन व दिग्दर्शन – आज्ञा अभिषेक कोयंडे ( ‘बुरगुंडा’ – शेठ म. ग. हायस्कुल), पुरुष अभिनय प्रथम – धैर्य सावंत (‘बुरगुंडा’ – शेठ म. ग. हायस्कुल), द्वितीय – कृष्णा मांजरेकर (‘कांदळवन नंदनवन’ – डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कुल देवबाग), तृतीय – केतक मेस्त्री (‘मुलमंत्र’ रोझरी इंग्लिश स्कुल), परीक्षक पसंती – वेद बोभाटे (बुरगुंडा), स्त्री अभिनय प्रथम – माही साटम (बारस – मित्र शिरगाव), द्वितीय – नेहा पाटील (बुरगुंडा), तृतीय – सावरी कांबळे (बुरगुंडा), परीक्षक पसंती – रिद्धी कुबल (देवबाग हायस्कुल), तांत्रिक अंगे- प्रथम – बुरगुंडा, शेठ म. ग. हायस्कुल देवगड, द्वितीय – बारस, मित्र शिरगाव, तृतीय – समीर चांदरकर (वराडकर हायस्कुल).

या स्पर्धेचे परीक्षण वैशाली पंडित, नितीन वाळके, अभय खडपकर यांनी केले. विजेत्या संघांना व वैयक्तिक पारितोषिक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी इको फोक्स व्हेन्चर्स संस्थेचे परेश पिंपळे, कांदळवन प्रतिष्ठानच्या सावंत, स्वराध्या फाउंडेशनचे सुशांत पवार, गौरव ओरसकर, सुधीर कुर्ले, अभय कदम, गौरीश काजरेकर, सुनील परुळेकर, महेश काळसेकर आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page