⚡मालवण ता.२७-: मालवण शहरातील बस स्थानक देऊळवाडा मार्गावर राम मंदिर नजीक असलेले आंब्याचे जीर्ण व धोकादायक स्थितीतील झाड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहरप्रमुख यशवंत गावकर व स्थानिक नागरिकांनी स्व:खर्चातून तोडून घेतले आहे. यामुळे संभाव्य धोका टळला आहे.
मालवण शहरातील बस स्थानक देऊळवाडा मार्गावर राम मंदिर नजीक आंब्याचे झाड जीर्ण होऊन धोकादायक स्थितीत होते. मार्गावरून जाणारी वाहने तसेच विज वाहिन्यांवर हे झाड कोसळून अपघाताची भीती होती. तात्काळ हे झाड न तोडल्यास विज वाहिन्या व विज खांब कोसळून मोठे नुकसान होईल याबाबत विज वितरणनेही सुचित केले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहरप्रमुख यशवंत गावकर व स्थानिक नागरिकांनी स्वखर्चातून हे झाड तोडून घेतले आहे. सोमवारी याबाबत कार्यवाही करण्यात आली. यावेळी यशवंत गावकर यांच्यासह बाबू कांदळकर, उमेश चव्हाण, सुहास वालावलकर, मनोज मोंडकर, पूनम चव्हाण, निना मुंबरकर, दीपक देसाई, कमलाकर खोत, पूजा तळाशीलकर, प्रसाद आडवणंकर, प्रदीप गावकर, हेमंत गावकर, आनंद बांबर्डेकर, दिगंबर वस्त, तसेच स्थानिक नागरिक यांच्या मदतीने जीर्ण व धोकादायक झाड तोडून पुढील धोका टाळण्यात आला.
