⚡सावंतवाडी ता.२७-: येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात नुकतीच संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांची जयंती आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आले.
प्रारंभी ॲड. शिवराम कांबळे, आर जी चौकेकर, मोहन जाधव कांता जाधव व संगीता मडूरकर यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. त्यानंतर ॲड. कांबळे यांनी व विनोद खोडके यांनी गाडगेबाबा यांचा जीवन प्रवास स्पष्ट केला. तर मोहन जाधव यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी सामाजिक कार्यकर्ते व ग्रंथालयाचे वाचक उपस्थित होते
