कणकवली वैश्य समाजतर्फे सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२७-: कणकवली वैश्य समाज यांच्यातर्फे कणकवली तालुक्यातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण प्रसारक मंडळ,कणकवली
अध्यक्ष दत्तात्रय उर्फ भाई तवटे यांचे हस्ते व माजी आमदार
राजन तेली, पर्यटन विकास महामंडळ माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, कणकवली नगराध्यक्ष
समीर नलावडे,जिल्हाध्यक्ष व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग प्रसाद पारकर,
वैश्य गुरू सेवा समिती, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दीपक अंधारी, वैश्य समाज,कणकवली अध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर, यांच्या उपस्थितीत संपन्न झाले
यावेळी कार्यकारिणीचे सचिव महेंद्र मुरकर ,उपाध्यक्ष
गुरुनाथ पावसकर , प्रवीण पोकळे,चंद्रशेखर वाळके,दिशा अंधारी,सुप्रिया अंधारी,डॉ विद्याधर तायशेट्ये, भालचंद्र अंधारी,सल्लागार बाळासाहेब वळंजू,राजन पारकर,प्रसाद अंधारी,उमेश वाळके, तानावडे,नांनचे,माणगावकर,शिरसाठ,कोदे,काणेकर शिक्षक वृनंद अन इतर वैश्य बांधव,भगिनी बहुस ख्येने उपस्थित होते
यावेळी समाजातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य अशा एकूण 54 अन समाजातील अन्य 11 मान्यवरांचा शाल,श्रीफळ, पुष्प,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करणेत आला,याबाबत सर्वांनी आभार व्यक्त केले.उदघाटक भाई तवटे यांनी काही प्रसंगोचित उदाहरणे देऊन सहकार्याने अन एकोप्याने काम करून समाजोन्नत्ती करावी असे आवाहन केले.राजन तेली यांनी शासनाच्या सर्व सुविधांची माहिती देऊन त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचावा असे मार्गदर्शन केले.संदेश पारकर यांनी कर्तृत्व,दातृत्व, वक्तृत्व यांचे जोरावर समाजाने नेतृत्व करावे असे कथन करून समाजाने आपणस अडचणीचे वेळी खूप सहकार्य केलेचे आवर्जून नमूद केले, समीर नलावडे यांनी सत्कार सोहळ्याचे कौतुक करून अशा उपक्रमांची समाजाला गरज असून सर्व प्रकारचे सहकार्य करणेची ग्वाही दिली, भविष्यात वैश्य भवन उभारलेस जागा अन आर्थिक योगदान देणेचे अभिवचन दिले. दीपक नेवगी यांनी गुरू महिमा कथन करून अध्यात्मिक उर्जेकडे निर्देश केला तर अध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी या सत्काराचे निमित्ताने कणकवली तालुक्यातील समाज बांधवांच्या एकतेची मशाल पेटून चांगले अन नाविन्यपूर्ण विचारांचे आदानप्रदान होईल,परिचय अन स्नेहबंध वाढतील,श्री श्री वामनाश्रम स्वामींच्या कृपा आशीर्वादाने समाज उन्नत्ती अन स्वप्ने सफल होतील असे सांगून शुभेच्छा दिल्या दिल्या.आभार प्रदर्शन गुरुनाथ पावसकर यांनी केले.प्रास्ताविक श्री तानावडे तर सूत्रसंचालन श्री. नानचे यांनी केले,सौ. माणगावकर, शिरसाट व अन्य मान्यवरानी सहकार्य केले.

You cannot copy content of this page