⚡वेंगुर्ले ता.२५-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वेंगुर्ले तालुका शिवसेना अंतर्गत येथील साई मंगल कार्यालयात रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजता शिवसंवाद मार्गदर्शन मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास शिवसेना नेते सुभाष देसाई, पक्षाचे सचिव तथा खासदार विनायक राऊत, उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, उपनेत्या मीनाताई कांबळी, माजी उपनेते विशाखा राऊत, माजी आमदार तुकाराम काते, संघटक श्रीमती कृष्णा विश्वासराव, युवा सेनेच्या कु. राजौल पाटील, आमदार वैभव नाईक, पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, वेंगुर्ले शहर संपर्कप्रमुख बाळा चीपकर, तसेच वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत परब, वेंगुर्ले शहर प्रमुख अजित राहुल वेंगुर्ले तालुका महिला आघाडी संघटक सौ सुकन्या नरसुले शहर संघटिका मंजुषा आरोलकर आदी उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात संघटनात्मक धोरणावर महत्त्वाचे मार्गदर्शन नेते उपनेते व पदाधिकारी करणार आहेत या मेळाव्यास इंगोले तालुक्यातील बेसिक महिला आघाडी युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच शाखाप्रमुख गटप्रमुख प्रमुख सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी जि प सदस्य माजी नगरसेवक तसेच सर्व माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वेंगुर्ले तालुका शिवसेनेचे प्रमुख यशवंत परब यांनी केले आहे.
