शिवाजी वाचन मंदिराचे आयोजन;धनश्री लेले या करणार कार्यक्रम सादर
मालवण दि प्रतिनिधी
मराठी राजभाषा दिनानिमित्त येथील श्री शिवाजी वाचन मंदिर येथे २६ फेब्रुवारी रोजी रसिक वाचक प्रस्तुत ‘ग-गप्पांचा’- ‘पुष्प पहिले’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. वक्त्या धनश्री लेले या कार्यक्रम सादर करणार आहेत. २६ फेब्रुवारीला सावरकर यांचा स्मृतिदिन व २७ रोजी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), ज्योत्स्ना देवधर व सुमती क्षेत्रमाडे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.
२८ रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिनी’ विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रदर्शन सकाळी ९.३० ते १ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत आयोजित केले आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.
