ठाकरे गटाची सभा उद्या कोळंबला

नेते सुभाष देसाई, खा विनायक राऊत, उपनेते अरुण दुधवडकर करणार मार्गदर्शन

मालवण दि प्रतिनिधी

शिवसेना ठाकरे गट मालवण तालुक्याची सभा २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता कोळंब येथील समर्थ हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. नेते सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत. रवींद्र वायकर, उपनेत्या मीनाताई कांबळे, माजी आमदार तुकाराम काते व राजाभाऊ वाजे, आमदार अजय चौधरी व वैभव नाईक, पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर, युवतीसेना राजोल पाटील, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page