⚡कणकवली ता.२४-: शिवसेना कणकवली शहरप्रमुखपदी सत्यजित उर्फ बाळू पारकर यांची नियुक्ती कणकवली मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आली आहे.
त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा खजिनदार भास्कर राणे ,जिल्हा प्रमुख( सोशल मीडिया) महेश तेली, कणकवली कलमठ शहरप्रमुख प्रशांत वनस्कर ,दामु सावंत ,तालुका समन्वयक सुनील पारकर , संदेश पटेल ,दिलीप घाडीगावकर ,मारुती सावंत व अनेक शिवसैनिक उपस्थित होते .यावेळी बाळू पारकर यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
