⚡मालवण ता.२४-: मालवण येथील मातृत्व आधार फाऊंडेशनच्यावतीने रविवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बॅ. नाथ. पै. सेवांगण मालवण येथे प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नॅशनल अवॉर्ड विजेते अभिजित वारंग यांच्यासह मराठी आणि हिंदी सिने,टीव्ही क्षेत्रांतील मान्यवर कलाकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक श्री संतोष लुडबे,आणि या कार्यक्रमाचे आयोजक दादा वेंगुर्लेकर यांनी दिली आहे
मातृत्व आधार फाउंडेशन या संस्थेने मालवणात सामाजिक, शैक्षणिक, उपक्रम राबवत जनमानसात आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे या पार्श्वभूमीवर मूळ सिंधुदुर्गातील असलेले प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक अभिजित वारंग यांनी
आपल्या चित्रपटात सिंधुदुर्गातील जनजीवन, आणि या ठिकाणचे समुद्रकिनारे इथल्या व्यक्तिरेखा आपल्या चित्रपटात त्यांनी समर्थपणे सादर करून सिंधुदुर्गातील प्रतिभावंत दिग्गज कलाकारांना त्यात महत्त्वाची भूमिका दिल्या आहेत श्री वारंग हे नॅशनल अवॉर्ड विनर असून त्यांच्या या योगदानाबद्दल तसेच त्यांचे सहकारी कलावंत अभिनेता प्रणव रावराणे, अभिनेत्री, अश्विनी कासार, हिंदी, मराठी मालिका स्टार. तारका पेडणेकर, नमिता गावकर यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमास मालवणचे तहसीलदार श्री. श्रीधर पाटील , मालवणच्या पोलीस उपनिरीक्षक प्रतीज्ञा खोत उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मातृत्व आधार फाउंडेशन मालवण यांनी केले आहे
