⚡सावंतवाडी ता.२४-: शहरात एक वृद्ध महिला वाट चुकल्याने ती सावंतवडी- वेंगुर्ला बस स्थानका समोरील रस्त्यावर काही नागरिकांना निर्देशनात आली होती. त्या नागरिकांनी तात्काळ सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांना कळविले. त्यानंतर जाधव त्वरित दाखल होत सदर वृद्ध महिलेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाईक यांचा शोध सुरू केला असता ही महिला कुडाळ येथील असल्याचे निर्देशनास आल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना पाचारण करत तिला नातेवाईकांच्या ताब्यात स्वाधीन केले. मात्र सामाजिक बांधिलकीच्या तत्पुरतेमुळे त्या वृद्धाला पुन्हा एकदा आधार मिळाल्याने नातेवाईकांनी सामाजिक बांधिलकीचे आभार मानले.
वाट चुकलेल्या महिलेला सामाजिक बांधिलकीमुळे मिळाले नातेवाईक
