बेपत्ता खलाशाचा मृतदेह देवगड खाडीत आढळला

२२ रोजी सायंकाळी बोटीतून पडला होता पाण्यात

देवगड,दि. (प्रतिनिधी) देवगड बंदरातील सुश्मिता सोनू चौगुले यांच्या मालकीच्या विद्या गणपत या मच्छीमारी नौकेवर एकनाथ पांडुरंग शिवगण वय ४५ राहणार मालगुंड तालुका रत्नागिरी हा खलाशी म्हणून कामाला होता २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास तो बोटीवरून खाली पाण्यात पडला त्याचा शोध घेऊनहि तो सापडून आला नाही.या संदर्भात तो नापत्ता झाल्याची तक्रार देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली होती. २३ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह देवगड खाडीत मिळाला आहे.

याबाबतची खबर त्याचा भाऊ संतोष शिवगण याने देवगड पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार राजन जाधव, पोलीस नाईक महेंद्र महाडिक करत आहेत

You cannot copy content of this page