कुडाळ शहरात बंद फ्लॅट मध्ये दिवसाढवळ्या धाडसी चोरी

पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर चोरट्याने मारला डल्ला

⚡कुडाळ ता.२३-: फ्लॅट मधील पती-पत्नी दिवसभर कामानिमित्त बाहेर याची संधी साधत कुडाळ मधील इंद्रप्रस्थ नगर येथील एका बंद फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी केली. यामध्ये सुमारे पाच तोळे सोने व रोख रक्कम लंपास करण्यात चोरट्याने यश मिळवले आहे. चोट्याने ही चोरी दिवसा केली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
कुडाळ इंद्रप्रस्थ नगर गणेश बिल्डिंग येथील सौ शर्वरी बाबाजी भोई यांच्या बंद फ्लॅट मध्ये खिडकीतून प्रवेश केला. व सुमारे ५ तोळे सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम अज्ञात चोरट्याने अगदी कोणताही मागमुस लागू न देता सहजपणे चोरून नेली. चोरी यामध्ये सुमारे २ लाख ५५ हजार रुपये किमतीचे दागिने व ५ हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे दोन लाख ६० हजाराचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. श्वानपथक व ठसेतज्ञ यांना बोलावत चोरट्याचा माघ काढण्याचा प्रयत्न केला. या सौ शर्वरी भोई यांनी कुडाळ पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवारी सकाळी नऊ वाजता बाजारासाठी पैशाची आवश्यकता असल्याने सौ. शर्वरी भोई यांनी आपल्या रूम मधील लोखंडी कपाटाचा मुख्य दरवाजा उघडला. यावेळी कपाटाच्या लॉकरमध्ये असलेले पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना कपाटाचा लॉकर कसल्या तरी हत्याराने उचकटलेला आढळला. लॉकर उघडून पाहिल्यावर लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र हार सोन्याची चैन कानातील सोन्याच्या कुडी जोड, पाच हजार रुपये रोख रक्कम अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे आढळले. तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र , दीड तोळ्याचा सोन्याचा हार , एक सोन्याची अर्धा तोळ्याची चैन , एक कुड्याचा जोड , व पाच हजार रुपये रोग रक्कम असा सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. सौ भोई व त्यांचे पती हे दिवसभर कामानिमित्ताने बाहेर असतात. याची संधी साधत अज्ञात चोरट्याने अगदी दिवसाढवळ्या ही चोरी केल्याचे समोर आले आहे. सौ भोई यांच्या फ्लॅटच्या मागील बाजूला स्लाइडिंग असलेल्या खिडकीला लोखंडी ग्रील नसल्याने याचाच फायदा घेत चोरट्याने लगतच्या पाईपचा आधार घेत पहिल्या मजल्यावर प्रवेश केला. व तेथून स्लाइडिंगचा खिडकीचा बंद दरवाजा अगदी चलाखीने सरकवत फ्लॅटमध्ये प्रवेश केला. यातील लोखंडी कपाटातील लॉकर धारदार हत्याराच्या आधारे उचकटून यातील दागिने व रोख रक्कम लंपास केली. कपाटाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या लॉकरचा दरवाजा उस्कटवत आतील चावी घेतली. व दुसऱ्या ठिकाणी ठेवलेला सोन्याचा हार लंपास केला. या बिल्डिंग मधील सीसीटीव्ही यंत्रणा गेल्या काही दिवसापूर्वीच बिघडली आहे. त्यामुळे चोरट्या बाबतचे पुटेच मिळू शकले नाही .या घटनेची फिर्याद सौ शर्वरी भोई यांनी दिली असून यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page