⚡देवगड ता.२०-: मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्यवृत्तपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्त देवगड तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार तथा परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी स्वाती देसाई यांनी प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व त्यांना अभिवादन केले.
याप्रसंगी महसूल नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर,निवासी नायब तहसीलदार विवेक शेठ ,पत्रकार दयानंद मांगले,वरिष्ठ लिपीक संजय रुमडे,कनिष्ठ लिपिक प्रमोद आचरेकर,प्रदीप कदम यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
देवगड पंचायत समिती कार्यालयातील छत्रपती संभाजी महाराज सभागृहात आद्यवृत्तपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दयानंद मांगले,सूरज कोयंडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
यावेळी सहा.प्रशासन अधिकारी संतोष बिर्जे,कनिष्ठ सहा. प्रशासन अधिकारी कुणाल,मांजरेकर,मेधा राणे,पत्रकार गणेश आचरेकर,वरिष्ठ सहाय्यक ,विलास लोके,कृषी अधिकारी दिगंबर खराडे,वरिष्ठ सहाय्यक प्रमोद मुणगेकर,कनिष्ठ सहाय्यक नितीन कोयंडे, विस्तार अधिकारी पी.पी.वळंजू,हवालदार रमेश चव्हाण,परिचर दयानंद जामसंडेकर उपस्थित होते त्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
फोटो-१)देवगड तहसीलदार कार्यालयात अभिवादन करताना तहसीलदार व अन्य
२)देवगड पंचायत समिती कार्यालयात अभिवादन करताना अधिकारी ,कर्मचारी,व पत्रकार बंधु
