मुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाईन बोलताना व्यक्त केला विश्वास
⚡ओरोस ता.२०-; मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. हे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरेल. या ज्ञान मंदिराचे पावित्र्यं जतन करुन बाळशास्त्री जांभेकराच्या पत्रकारितेचा वारसा पुढे नेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे करुन शुभेच्छा दिल्या.*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीव्दारे शुभेच्छा देताना म्हणाले, आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण मधून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक सुधारणेवर भर दिला. त्यांचं स्मारक मराठी पत्रकारांना, भावी पत्रकारांना प्रेरणा देणारं ऊर्जा देणारं ठरेल. ज्ञान मंदिर बनवून त्याचं पावित्र्यं जतन करुया. त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांना करायचे आहे. हे स्मारक त्यासाठी प्रेरणा आणि स्फूर्ती देणारं ठरेल.भविष्यातही जे जे आवश्यक आहे. ते ते सरकार पूर्ण करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कार्यक्रम प्रसंगी आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पद्मश्री परशुराम गंगावणे, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एम. एम. देशमुख, किरण नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव देवयानी वरसकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार गजानन नाईक, अण्णा केसरकर, नंदकिशोर महाजन, शशी सावंत, गणेश जेठे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनिष दळवी आदी उपस्थित होते.
