सकल मराठा समाज कणकवली यांच्यावतीने शिवजयंती साजरी
⚡कणकवली ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सकल मराठा समाज कणकवली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच शिवसृष्टी व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले.
या व्यासपीठाचे उद्घाटन मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते एस.टी.सावंत व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते लवू वारंग, सुहास सावंत, अवधूत तावडे, नगरसेवक सुशांत नाईक, विद्याधर तायशेटे, भाई परब, नगरसेविका प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, विस्तारअधिकारी सूर्यकांत वारंग, बच्चू प्रभूगावकर, शेखर राणे, महेंद्र सांबरेकर, बबलू सावंत, तेजस राणे, संदीप राणे, सुशील सावंत, सुशांत दळवी, सोनू सावंत, महेश सावंत, किशोर राणे, आनंद पारकर, हर्षद गावडे ,शैली सावंत, सुवर्णा राणे, तन्वी भावे, नीलम सावंत, महेंद्र गावकर, विभा सावंत, आदिती मालपेकर, साक्षी आमडोस्कर आदी उपस्थित होते.
