छत्रपती शिवाजी नगर उत्कर्ष मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी

⚡कणकवली ता.१९-: छत्रपती शिवाजी नगर उत्कर्ष मंडळ कणकवलीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘जय शिवाजी जय भवानी ‘ छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय… जय .. शिवाजी अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.


यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,अध्यक्ष राजेंद्र वर्ने,उमेश वाळके, सोहम वाळके, मनोज मुसळे,अभय खडपकर सूर्यकांत गाडी, चेतन ताम्हणकर, माधवी मुरकर, महेंद्रकुमार मुरकर, अशोक मर्गज,प्रसाद महाडेश्वर, दिलीप हिंदळेकर,ग्रामस्थ,विद्यार्थी उपस्थीत होते.

You cannot copy content of this page